Friday, June 3, 2011

आंबेडकरी साहित्य (Ambedkarite Literature)


- आंबेडकरी साहित्य म्हणजे आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तित्व - कर्तृत्व आणि तत्त्वज्ञान यांच्या प्रेरणाभावातून आंबेडकरी साहित्य उर्जवान होते. मानवमुक्तीसाठीची जनआंदोलने आणि आंबेडकरी साहित्य हे परस्पर पूरक अथवा परस्पर सापेक्षच नव्हे तर ते अभिन्न आहेत. एकमय आहेत.

जगाची समताधिष्ठित पुन:रचना, मानवी स्वातंत्र्याचे समर्थन आणि बंधुभावयुक्त मानवी संबंधांवर आधारित मानवी समाजाचे निर्माण हे आंबेडकरी साहित्याचे प्रयोजन आहे. समता - स्वातंत्र्य- बंधुभाव ही तत्त्वत्रयी परस्पर पूरक आणि परस्पर संमिलीत मानणे व तिचा पुरस्कार करणे हा आंबेडकरी साहित्याचा सत्त्वभाव आहे.
नैसर्गिक हक्क नाकारलेल्या अर्थावंचित व्यक्ती व व्यक्ती-समूहांना त्यांचे मानवी हक्क व सत्त्व प्राप्त व्हावे यासाठी मुक्ती लढ्याचा उदघोष करणे हे आंबेडकरी साहित्याचे ध्येय आहे या अर्थाने आंबेडकरी साहित्य हे मानवमुक्तीच्या ' चळवळीचे साहित्य ' Literature of Libaration ' आहे म्हणून कलात्मकता आणि सामाजिकता यांच्या समतोलाचे सौंदर्य त्यातून प्रतीत होते.
व्यक्तिगत संवेदनविश्व आणि सम्यक तत्त्वदर्शन यांच्या गुणणातून (multiplication) साहित्यिकाचे व्यक्तित्त्व घडते. तेच साहित्यकृतीतून प्रस्पुरीत होते म्हणून आंबेडकरी साहित्य हे तत्त्वभावात्मक साहित्य आहे.
व्यक्तीचे संवेदनविश्व प्रभावित करणारी परिस्थिती विद्रूप असेल आणि / किंवा व्यक्तीमात्रांजवळ तत्त्वज्ञानाचा अभाव असेल अथवा चुकीचे तत्त्वदर्शन तो धारण करीत असेल तर त्याचे जीवनाविष्कार सर्जनशील ठरत नाही. त्याला या दु:खस्थितीतून मुक्त व्हावे लागते... जेव्हा गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली जाते आणि तो बंड करतो तेथेच मुक्तीलढे प्रारंभ होतात. मुक्तीची अनुभूती सुंदर असते. मुक्तीचे सौंदर्य हेच खरे सौंदर्य. मुक्तीलढा हा सर्जनाचा उत्कट आविष्कार असतो. व्यक्तिविशिष्ट आणि समूह पातळीवर तो सर्जनशील निर्मितीचे नवे प्रतीत्य समुत्पन्न आविष्कार घडवीत राहतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला त्याच्या दलितत्त्वाचे कारण सांगितले. कार्यकारणभावाचे अन्वेषण करण्याची प्रतिभा दिली मुक्तीचे मार्ग सांगितले. मुक्त होऊन मानवाचे पुनरुत्थान करण्याचे ध्येय दिले. या ध्येयातूनच आंबेडकरी क्रांतिकारी तत्त्वज्ञानाचा मूल्यव्यूह तयार झाला हा मूल्यव्यूहच आंबेडकरी साहित्याचे प्राणतत्त्व होय.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी दलीतत्त्व विसर्जित करून ज्यांनी लोकविदू बुध्दाचा बुध्दिप्रमाण्यावादी मूल्यविचार स्वीकारला त्यांची जीवनमूल्ये नीतीमूल्ये व सौंदर्यमूल्ये बदलली त्यांचे प्रतिभा आविष्कार अनन्यपणे नवेच होते.' जीर्ण मूल्यांची घोंगडी फेकून देऊन नवी निळी शाल पांघरा"--- असे त्या स्थितीचे वर्णन महाकवी वामनदादा यांनी तेव्हा केले होते. १९९३ च्या वर्धा येथील पहिल्या अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात लिहिले होते --- '' जीवनात श्रेष्ठ आदर्श कोणता यांची मांडणी आंबेडकरी तत्त्वज्ञान करते. आंबेडकर हे आता एका व्यक्तीचे नाव राहिलेले नाही, ते आता एका विचारधारेचे नाव झालेले आहे. आणि आमच्या लिहिण्याची प्रेरणा तर आंबेडकरीच आहे. म्हणून आपल्या या साहित्याला 'दलित ' साहित्या ऐवजी 'आंबेडकरी साहित्य' संबोधावे असा विचार अनेक वर्षापासून सुरु आहे. आंबेडकर जन्मशताब्दीपासून म्हणजे गेल्या दोन - तीन वर्षापासून हा समूह विचार बनत चालला आहे. आता शाब्दिक अवडंबर आणि वैचारिक गोंधळ नको आहे. या साहित्य संमेलनाच्या आयोजनामुळे आपण या वळणावर येऊन पोहचलो की, यापुढे आमचे साहित्य हे ' आंबेडकरी ' या नावानेच ओळखले जाणार आहे.
' दलित ' या शब्दात मनाच्या कोपऱ्यात विषमतावादी हिंदुत्व जोपासण्याची व कधी कधी मार्क्सवादी म्हणवून क्रांतिकारी समजून घेण्याची जी सोय होती ती यापुढे "आंबेडकरी" या शब्दात राहणार नाही. आंबेडकरी म्हणजे तथागाताचा जीवनमार्ग स्वीकारणारा, फुल्यांच्या सामाजिक, धार्मिक विचाराचे विश्लेषण करणारा आणि अखिल मानवी समता मूल्यावर आढळ विश्वास बाळगणारा माणूस होय.
आंबेडकरी साहित्यातील कथा, कवितेला हे भान ठेवावे लागणार आहे. आंबेडकरी साहित्य म्हणजे दलित साहित्याच्या निर्मितीचा पुढील विकास टप्पा होय.
'दलीतत्त्व' हे हिंदुत्व सापेक्ष असते. क्रमबद्ध विषमतेची इतकी अमानुष नकारात्मक मनोवस्था काळाच्या कुठल्याही टप्प्यावर अन्यत्र आढळत नाही. भारतातून बुद्धविचारांचा ऱ्हास झाल्यानंतर मध्ययुगीन कालखंडात केव्हा तरी बुद्धिप्रामाण्यवाद बहिष्कृत केला गेला. त्यातून दलितत्त्व लादले गेले. दलितत्त्व ही मनोवस्था आहे. तिचे नेहमी वर्ण-व्यवस्थेतील अन्य वर्ण-जातींशी द्वंद्वात्मक संबंध राहणार ! अर्थात जोपर्यंत दलितत्त्व राहील तोपर्यंत धर्मकलह राहील आणि त्यातून कोणतेही सर्जन घडणार नाही. म्हणून राष्ट्रहीत आणि दलितत्त्वाचा विलय होणे अपरिहार्य आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही द्वंद्वात्मकता संपविण्यासाठी बुद्धाविचाराची ' नवी नैतिकता ' स्वीकारली. ज्यांनी ही नवी नैतिकता स्वीकारून नव्या सामाजमूल्यांचे - समष्टीशी बांधीलकीचे वाड:मयीन ध्येय स्वीकारले त्यांचे साहित्य सर्जनशील झाले.
- भीम-गीतकारांनी आपल्या गीतातून आंबेडकरी प्रेरणा प्रथमत: संप्रेषित केली. आंबेडकरी चळवळीत त्यांचे योगदान अनन्य महत्त्वाचे आहे. स्वत:ला दलित साहित्यिक म्हणवून घेण्याची आवश्यकता त्यांना वाटली नाही.
- दलित मुक्तीसाहित्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे अभिजनांना कळले नाही. त्यांनी जनतेच्या मुक्तीसाहित्याला दलितसाहित्य संबोधीले ! स्वत्वशोध न घेता इतरांनी दिलेले हे संबोधन स्वीकारणे आंबेडकरी साहित्याने नाकारले. विभावरी/श्री.म. माटे/शरच्चंद्र मुक्तिबोध/ मुल्कराज आनंद / अमृतलाल नागर / यांच्या काही साहित्यकृतीतून मानुष जाणिवा व्यक्त होतात. म्हणून त्यांना दलित साहित्यिक म्हणविणे जमत नाही. ज्यांना दलितत्त्व भारताचे रूपक वाटते त्यानाही ते स्वत; प्रत लावून घेणे साहणार नाही. कुणीतरी दलित असेपर्यंतच आपण उच्च राहू शकतो, हे जाणणारी माणसे दलितत्त्वाचे उदात्तीकरण करतात - हे अज्ञान की कौटिल्य !
- 'शोषणाचा, गुलामीचा संदर्भ ज्या साहित्याला असेल आणि त्यातून मुक्तीची जाणीव आंबेडकरी प्रेरणेने झाली असेल असे जगातील कोणतेही साहित्य आंबेडकरी साहित्य आहे'. म. भ. चिटणीस, भदंत आनंद कौसल्यायन, रूपा बोधी, माईसाहेब आंबेडकर, यांचे साहित्य आंबेडकरी साहित्यच ठरावे. तसेच जगभर आंबेडकरवादाची उर्जा घेऊन लढणारे साहित्यिक आंबेडकरी साहित्याची निर्मिती करतील.
- मिलिंद साहित्य सभा, अस्मितादर्श, सिंहगर्जना, समुचित , निकाय, या विचारपीठांतून आंबेडकरी साहित्य साकारत गेले. नामदेव ढासळ, राजा ढाले, बाबुराव बागूल, यशवंत मनोहर, यांनी आंबेडकरी साहित्याला युगसाहित्य ठरविले. आता नव्या ई-युगात आंबेडकरी साहित्यच जागतिक साहित्याचे वैचारिक नेतृत्व करेल .....याचे भान आंबेडकरी साहित्यिकांनी बाळगून साहित्य निर्मिती केली पाहिजे....
( http://ambedkarisahityaparishad.yolasite.com वरून साभार )

Make a free website with

Thursday, June 2, 2011

नात : पावसाच नि माझ


आभाळाची फाटली कूस
आला पाऊस, आला पाऊस

तस या पावसाच नी माझ
दरवर्षीचच नात
आभाळ भरून येताच
हृदयात घरघरते जात
भोकाळलेल्या झोपडीला
हाताने झाकताही येत नाही
आणि वादळाच्या धाकाने बाहेर
पळताही येत नाही

पाऊस घेऊन येते मरण
पाऊस पेरून जाते जीवन
पाऊस ठेवते गर्भार धरणी
पाऊस पळवते तोंडच पाणी

तापत्या मातीवर पूस पडताच
गंध मोहरून येते
माझी वस्ती पावसात भिजते
तेव्हा डोळे भरून येते
डोळ्यातल्या डोळ्यात आटते पाणी
अस पावसाच मन आहे कोळंश्यावणी

Sunday, January 9, 2011

एक पत्र - व्यवहार : ज्यातून एक जबाबदारी पेलायची जाणीव झाली




वर्धा : भारतातल्या महाराष्ट्र राज्यातील अस एक गाव ज्या गावाला बौद्ध तत्त्वज्ञ धम्मानंद कोसंबींच्या निर्वाण भूमीचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे, त्याच गावात १९९३ साली महाकवी वामनदादांच्या अध्यक्षतेखाली पहिले आंबेडकरी साहित्य संमेलन संपन्न झाले आणि ' आंबेडकरी साहित्य ' ही संज्ञा पुढे आली. आज या घटनेला दीड दशक पूर्ण होत आहे. त्या दरम्यान तीन अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलने या शहराने आयोजित केली. त्यानंतर हे तिसरे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन या शहराने आयोजित केले. त्याच्या अध्यक्ष पदाच्या संदर्भात झालेला हा ई- मेल व्यवहार

To,
Prof. Sateshwar Morey
Amravati
Subject - Invitation for 3rd Ambedkari Yuwa Sahitya Sammelan
Reference - 2nd Ambedkari Yuwa Sahitya Sammelan, Yavatmal .
Sir,
we the Ambedkari Sahitya Parishad are very happy to inform you that we are conducting 3rd Ambedkari Yuwa Sahitya Sammelan in Wardha on 2nd jan 2011। As you know, we have already decided that you have to preside over the Sammelan and I have already discussed with the other members of the Sanwardhan Mandal and everybody delighted with your name and given approval
Officially, president & secretary of the Mandal may not have given you official letter, they should have given, but they are ringing you continuously regarding your presiding। I think we all are responsible for this telephone process because since the mandal established and Amravati sammelan was over we didn’t took any meeting regarding establishment of mandal. All the procedures and the discussions of the mandal we shared telephonically, it means we have recocknize telephone is official part. At this time also president and secretary are doing the same. I think this is the technical point but important is the emotions of all members who have given consent and they are very delighted with your name.
Having discussion with Mandal officers, being a cashier of Mandal, president of the Ambedkari Sahitya Parishad and organizer of the 3rd yuwa sammelan, on behalf of all these things, I am conveying you the decision that you have been elected to preside over the 3rd Ambedkari Yuwa Sahitya Sammelan. Actually we have started the preparation with your name and nothing can do at this stage.
We the Wardhawasi have a lack of writers and speakers so don’t understand that what we have to write and what not, but our emotions are true and very transparent. If any thing gone wrong here, I apologize that.
Finally, we hope that you will consider this as an invitation and will convey the positive consent to president and secretary of mandal either telephonically or by any medium which you decide.
Thank you and JAY BHIM.
Yours,
Arvind Nikose
अर्थात, हा ई-मेल अनपेक्षित नव्हता त्याचा तगादा गेल्या वर्षभरापासूनच सुरु होता. काही जबाबदरया माणसाची इच्छा असो वा नसो त्या सामाजिक दायित्व म्हणून स्वीकाराव्याच लागतात.

मा. अरविंदजी,
सस्नेह जयभीम
आपण दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करताना जेवढा आनंद व्हायला हवा होता तेवढा तो होत नाही. गेल्या वर्षभरापासून आपण करीत असलेला हा आग्रह आणि वर्धेकरांशी असणारा अत्यंत घनिष्ट कौटोम्बिक संबंध यामुळे हे निमंत्रण टाळता येणार नाही याची मला तीव्र जाणीव आहे.
मुळात आपण सर्व एकाच कुटुंबातले, हे कुटुंब साकारताना किती कष्ट पडतात हे आपण सगळे जाणताच या सगळ्या प्रकरणात हे कुटुंब बाधित होऊ नये किंवा कुठलाही गैरसमज निर्माण होऊ नये असे मनापासून वाटते. हा या कुटुंबातल्या माणसांनी केलेला सन्मान आहे. एकमेकाबद्दल असलेल्या आपुलकीतून तो माझ्या वाट्याला आला आहे. ही माझ्या पाठीवरची थापही नाही; किंवा माझ्या कर्तुत्वाचा गौरव पण नाही, ही एक जबाबदारी आहे. ती मला पेलते किंवा नाही याचा कोणताही विचार न करता मी ती स्वीकारत आहे. अर्थात, आपला मझ्यावर अतिरेकी असणारा विश्वास आणि चळवळीवर असणारी निष्टा यामुळे ही जबाबदारी देखील हलकी वाटेल याबद्दल कुठलीही शंका नाही.
काय आहे अरविंदराव! आपण सगळेच या सगळ्या मान - सन्मानाच्या पल्याड गेलेली माणस आहोत, आपण असे आहोत, म्हणूनच या वास्तवात टिकून आहोत. हेच जर आपल्यातून निघून गेल तर?
अर्थात, या वास्तवात टिकण्याच्या किंवा न टिकण्याच्या भीतीपोटी मी बोलत नाही, तर या पद्धतीने काम करणारी; आणि समाजाचा विश्वास संपादन केलेली मंडळी आज कुठेच दिसत नाही; आणि अशा आपल्या भावनिक वर्तनातून आपणही बाद झालो तर, आपल्या व्यक्तिगत हानीपेक्षा जी सामाजिक हानी होणार आहे, ती फार मोठी असणार आहे,
कोणत्याही माणसाला मन असते आणि तेच आपल्या समजण्याच्या पलीकडे असते. म्हणून सगळेच वांदे आहेत .असो जे काय असेल किंवा होईल ते आताच सांगता येणार नसले तरी आपण मात्र याचे भान ठेवले पाहिजे असे मला वाटते. असो आपण सगळे मिळून या संमेलनाला ऐतिहासिक बनवण्याचा प्रयत्न करू या! आभार कसले मानायचे ? आपल्या अर्थात वर्धेकारांच्या मनातल्या आपुलकीपेक्षा ते मोठे नाही. बस ती टिकावी अधिक वृद्धिंगत व्हावी एवढीच विनम्र अपेक्षा! आंबेडकारी साहित्य परिषदेच्या सर्वाना जयभीम!
सतेश्वर मोरे