Monday, June 8, 2009

...हे असे होऊ नये!.. यासाठी काय करावे लागेल?...

आज महिण्यानंतर मी माझा ब्लॉग ओपन करतो आहे आणि त्याच्या तळाशी असणारया दोन कॉमेंट्स अत्यन्त आनंदाने ओपन करतो। बघतो तर काय? दिव्यता आणि आदरणीय उदयजी माझे अनुक्रमे पाहिले आणि दुसरे वाचक आहेत पहिल्यांदाच एवढे जाणकार वाचक लाभलेला मी कदाचित पहिला ब्लागर असेल? उदयजी आणि दिव्यता यांचे मनापासून आभार!... खरं म्हणजे जेव्हा हा ब्लाग ओपन केला त्यावेळीच मी यातले सातत्य कायम रहावे असा निश्चय केला होता पण तसे घडले नाही...असे होऊ नये! यासाठी काय करावे लागेल? हा माझ्या समोरचा मोठाच प्रश्न आहे! उदयजीना ते कसं जमतं ते त्यांनाच ठाउक ? अनेक बाबीं बाबत चर्चा व्हावी असं नेहमीच वाटतं , मनातल्या मनात ती होतेही पण तिचे लेखन होत नाही याचे दु:ख आज मला जास्तच जाणवत आहे। गेल्या दिवसात असेच निवडणुका, त्यात झालेला रिपब्लिकन पक्षाचा पराभव ,अकोला जिल्हयात एका बौध्द महिलेची काढलेली धिंड , मीरा कुमार यानची लोकसभेच्या सभापती पदावर झालेली नियुक्ती, डॉ नरेन्द्र जाधवांचे नियोजन आयोगावरील सादस्य पद या सगळ्या विषयांवर लिहायचे होते। लिहले नाही म्हानान्यापेक्षा ते लिहले गेले नाही असेच म्हणावे लागेल । हे सगळे विषय अत्यन्त महत्वाचे होते ...

Thursday, April 30, 2009

आंबेडकरी साहित्य मेळावा,अकोला : अ. भा. आंबेडकरी साहित्य व् संस्कृती संवर्धन महामंड्ळाचे पाहिले प्रसरण

अकोला : डाँ बाबासाहेब आंबेकराचे नातू अड़ प्रकाश आंबेडकर याच्या अकोला पँटर्न या सूत्राने सम्पूर्ण देशात गाजलेल्या या जिल्ह्यात गेल्या पंचवीस वर्षा पासून सांस्कृतिक आन्दोलन मंदावले होते अमरावतीच्या साहित्य सम्मेलानापासून प्रेरीत होऊन संजय डोंगरे , भगवंत तायडे ,ना मु काम्बले यांच्यासारख्या काही जुन्या परन्तु नव्याने कामाला लागलेल्या कार्यकार्त्यानी हे आन्दोलन पुन्हा नव्या तेजाने आणि नव्या रुपाने सुरु केले आणि भीम जयंतीचे औचित्य साधून मुक्तीच्यामुक्तीच्या साहित्य मेलाव्याचे आयोजन केले. ध्यासानेमुक्तीच्या वाङ्मयीन दृष्टीने समीक्षा लेखन करणारे समीक्षक तथा श्रीमती के. ला. महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख दान. वसंत शेंडे याची मेलाव्याचे अध्यक्ष म्हनून यथोचित निवड केली, डॉ गंगाधर पानतावने सर उद् घाटक होते, एक देखना सोहळा या मंडळीनी साकार केला. वसंतरावांचे भाषण समकालाची वाङ्मयीन यातार्थाता आणि ध्यासानेमुक्तीच्या वाङ्मयाची काल सापेक्षता ध्यासाने करणारे आहे आंबे डकारी प साहित्य म्हणजे आबेसाहित्य इतक्या सोप्या सरल भाषेत त्यानी आंबेडकारी साहित्याची व्याख्याa केली डालीt निकालत काडाल्या शिवाय दस्यत्व निकालात निघणार नाही याचे भा न आपण आता ठेवले पाहिजे यानिमित्ताने दलित नव्हते ते दलित मुक्तीच्या ध्यासाने व्याकुल झाले होते देव धर्म आणिमोठ्या असनारया माणसाला मूल्य प्रदान करीत होते

Thursday, April 23, 2009

नव पर्वारभ....

आज हा ब्लॉग ओपन केला त्याचे सातत्य कायम रहावे एवढेच! याशिवाय आज पर्याय नाही नव्या पीढीशी बोलायचे असेल तर हाच एक मार्ग आहे, या पीढीशी तुमचा संवाद नसेल तर तुम्ही विस्मरनात जाल ! याचे भान ठेवा आणि हा नव मार्ग पत्करलेला बरा !

सतेश्वर मोरे

अमरावती (महारास्ट्र ) भारत
अधिव्याखाता आणि मराठी विभाग प्रमुख,
बरी रामराव देशमुख कला, श्रीमति इंदिराजी कपाडिया वाणिज्य आणि
न्यामूर्ति कृशस न राव देशमुख विद्न्याँन महाविद्यालय बडनेरा - अमरावती
आंबेकरी मराठी लेखक ,वक्ता
निमंत्रक : अखिल भारतीय आंबेकरी साहित्य व संकृति संवर्धन महामंडल