Monday, June 8, 2009

...हे असे होऊ नये!.. यासाठी काय करावे लागेल?...

आज महिण्यानंतर मी माझा ब्लॉग ओपन करतो आहे आणि त्याच्या तळाशी असणारया दोन कॉमेंट्स अत्यन्त आनंदाने ओपन करतो। बघतो तर काय? दिव्यता आणि आदरणीय उदयजी माझे अनुक्रमे पाहिले आणि दुसरे वाचक आहेत पहिल्यांदाच एवढे जाणकार वाचक लाभलेला मी कदाचित पहिला ब्लागर असेल? उदयजी आणि दिव्यता यांचे मनापासून आभार!... खरं म्हणजे जेव्हा हा ब्लाग ओपन केला त्यावेळीच मी यातले सातत्य कायम रहावे असा निश्चय केला होता पण तसे घडले नाही...असे होऊ नये! यासाठी काय करावे लागेल? हा माझ्या समोरचा मोठाच प्रश्न आहे! उदयजीना ते कसं जमतं ते त्यांनाच ठाउक ? अनेक बाबीं बाबत चर्चा व्हावी असं नेहमीच वाटतं , मनातल्या मनात ती होतेही पण तिचे लेखन होत नाही याचे दु:ख आज मला जास्तच जाणवत आहे। गेल्या दिवसात असेच निवडणुका, त्यात झालेला रिपब्लिकन पक्षाचा पराभव ,अकोला जिल्हयात एका बौध्द महिलेची काढलेली धिंड , मीरा कुमार यानची लोकसभेच्या सभापती पदावर झालेली नियुक्ती, डॉ नरेन्द्र जाधवांचे नियोजन आयोगावरील सादस्य पद या सगळ्या विषयांवर लिहायचे होते। लिहले नाही म्हानान्यापेक्षा ते लिहले गेले नाही असेच म्हणावे लागेल । हे सगळे विषय अत्यन्त महत्वाचे होते ...