Thursday, July 15, 2010

माणुसकीच्या अफाट धर्माची बाधा


खैरलांजी प्रकरणात मुम्बई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल अनपेक्षित नव्हता. तो यासाठी की तो तसाच यावा असेच प्रयत्न सगळ्याच यंत्रनेने मनापासून केले त्यात ते यशस्वी झाले याचा अर्थ ते जिंकले आणि न्यायासाठी प्राणपनाने लढणारे पराभूत झाले असे नाही. कोर्टाचा निर्णय हा न्याय असतो. हे आता केव्हाचेच कालबाह्य झाले आहे. तो केवल आरोपी आणि फिर्यादीना दिलेला एक निकाल असतो.
न्याय व्यवस्था हा लोकाशाहिताला अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. माध्यम आणि विधिमंडल व् मंत्रीमंडलाची राजकारनाने काय अवस्था केली आहे. हे सगलेच जाणतात. केवल न्यायव्यवस्थेवरच समाजाचा थोडासा विश्वास होता तोही आता धुलित मिळाला आहे.या सगल्या व्यवस्थेत माणूस असतो तो जोपर्यंत निकोप असत नाही तोपर्यंत सगळी व्यवस्थाच कुचकामी आहे नेमके हेच खैरलान्जीच्या संदर्भात घडले. अत्यंत पूर्वग्रहदूषित भावनेने हे प्रकरण हतालले गेले
एका आन्धल्या पोराला, अजान पोरीला,पोराला आणि त्यांच्या आईला कृरतेने ठेचून थर मारले गेले त्यांची प्रेते नग्नावस्थेत गावाच्या बाहेर फेकली गेली. ज्यानी ते केले त्यांनाही पश्चाताप नाही यामागे केवल व्यक्तिगत कारण असू शकत नाही हे शेम्बड़े पोरही जानते पण न्यायालयाला कळत नाही.
म्हणून दलित अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यात हे बसत नाही. यात कुठलाही विनयभंग नाही.अंध मुलाला ठार करणे यात कुठलीही क्रूरता नाही जे गेले त्यांच्याबाबत दु;ख आहेच, पण ज्यानी हे घृणित कृत्य केले त्यांच्याही बाबत आमच्या मनात दयाभाव कमी नाही. असा आमचा माणुसकीचा धर्म अफाट आहे
गवई बंधू , पोचिराम काम्बले मनोरमा काम्बले, अशा असंख्य प्रकरणाला या आमच्या माणुसकीच्या अफाट धर्माची बाधा झाली आहे खैरलान्जिला तर या बाधेने अक्षरश; गिलून टाकले आहे
न्यायचे काहीही होवो ह्या आमच्या माणुसकीच्या धर्माची अफाटता कायम राहिली पाहिजे

Wednesday, April 14, 2010

माणूस बदलतो त्या दिशेने ............


काळ आणि माणूस
यांच्या अभिन्न नात्यातून जन्माला आलेलं आयुष्य
भाजून निघालय भूतकाळाच्या तव्यावर
जातीचं अमूर्त भांडवल. धर्माचे स्थावर जंगम
मी अजूनही होत नाही नादार
या जागतिकीकरणाच्या नादात
आरत्यांचा आक्रोश, दातृत्वाचा दंभ
भंगून गेले आहे विवेकाचे खांब
भावनांचे दुखणे वाढले आहे
धरले आहे सगळ्याच महापुरुषांना वेठीस
विटंबनेच्या आगीत माणुसकीची झालेली राख
पसरली आहे आमच्या घरादारांवर
वाऱ्यावर उडते आहे जिन्दगानी
आम्ही गात आहोत ग्लोबल गाणी

बाबासाहेब! काळाने बदलली आहे कूस
तुमच्याशिवाय बोलतच नाही कुठलाही माणूस
अनटचेबल असणारे तुम्ही
झाले आहात जगाची गरज
विटाळाचा तर सोडाच बाबासाहेब
सगळेच उभे आहेत एका रांगेत तुमच्यामागे ताटकळत
तुम्हाला टाळून कोणीच पुढे जाऊ शकत नाही
तुम्हाला सोडून कोणालाच आता पूर्ण होता येत नाही
माणस बदलली कि, काळ बदलला
काहीच काळात नाही, बाबासाहेब!
पण तुम्ही झाला आहात या युगाचा कळस
काळाने झटकून टाकलाय आपला आळस
विकाराचे पक्षी गेले आहेत उडून
खोप्यावरची बुरशी गेली आहे झाडून

हे आकाश कस झाल आहे निळ- निळ स्वच्छ
काळ्या ढगांचे तांडे झाले आहेत बेपत्ता
वादळाने कोंडून ठेवले स्वताला बेमुदत
कोणीच का गात नाही माणसांच्या कल्याणाचे पावडे!
का लोंबकळत आहे लोकशाहीच्या झाडावर
आमच्याच अस्मितेचे सांगाडे ?

बाबासाहेब! समतेला झाली आहे तुमची आदत
ममतेला लागते तुमचीच मदत
बंधुत्व तुमच्या आधाराशिवाय उभाच राहू शकत नाही
तुमच्याशिवाय स्वातंत्र्याला अर्थच उरत नाही
कुठे मुरत आहे सामाजिक न्यायचे पाणी काळात नाही
उजेडच्या फांदीवर वसलेला कावळा उडता उडत नाही

अंधाराचे कलेवर खांद्यावर घेऊन
तुम्ही आलात धावत मझ्या दिशेने बेभान
तुडवत वर्णाचे पर्वत
जाळत जातीचे इमले
फेकून दिले मानगुटीवर बसलेले धर्माचे झमेले
तुम्ही शोधलाय एक नवा माणूस
तो असतो जातीधर्मवर्णाच्या पल्याड
जो काळाला खेळवतो हातावर
अस्तित्वाचा झुला बांधतो अवकाश्याच्या छतावर
तो घेतोय सूर्य उशाला
आकाशाची पांघरतो चादर
पृथ्वीची करतो घागर
त्याला नसते जगण्याची चिंता आणि मरणाची भीती
तो पकडत नाही बुरसटलेल्या रूढी परंपरेचा हात
पाळत नाही रीतीरिवाज
अडकत नाही संस्कृती- संस्काराच्या बंधनात
तो सापडतो तुम्हाला निरंजनेच्या काठावर
पिंपळाच्या पानावर
तो उठतो समाधीतून
मारतोय हाक वास्तवाला
तो अन्गुलीमालाला देतोय हात
अति मत्त हत्तीवर करतो मात
तुम्ही दिलाय त्याच्या हातात आमचा हात
अंधाराचे कलेवर पळून गेले रातोरात

बाबासाहेब! काळ कधीच थांबत नसतो
ताटकळत आपल्या दारावर
तो वर्तमानाला लावतो पटकन भूतकाळाचा चेहरा
भविष्याची बदलतो दिशा
माणसाला देतो नवी भाषा
विश्वाच्या गुळावर एल. पी. जी.च्या माशा
गळाला बांधलेला ग्याट चा घन्टा तोडायचा कसा
हरेक माणूस त्यांच्या गळाचा मासा
समाजवाद पडलाय घोरत भांडवलदाराच्या दारात
साम्यवादाने तानल्याय तंगड्या आपल्याच घरात
साम्यवादानंतर भांडवलशाही
भांडवलशाहीनंतर काय?
भांडवलशाहीनंतर समाजवाद
समाजवादानंतर काय?
सगळ्याच महासत्तांना लागली आहे चिंता
या मंदीच्या काळात आपल्या अस्तित्वाची
सगळ्याचेच आता चुकले आहे गणित
त्यांनी भैवातीकाचा केला गुणाकार
माणसाची केली बाजाबाकी
मूल्यांचा केला भागाकार
सगळ्यांच्याच हाती उरले एक शून्य
सगळेच स्वनाम धन्य!
शोधत आहेत आपले अस्तित्व
बाबासाहेब! तुम्ही एक पूर्ण सत्य
तुम्ही बांधली आमच्ची गाठ अनित्याशी
आम्ही धरली आहे तुमच्या तत्वाची कास
आता माणूस बदलतो त्या दिशेने आमचा प्रवास
माणूस बदलतो त्या दिशेने आमचा प्रवास

सतेश्वर मोरे

Friday, April 9, 2010

आंबेडकरी कार्यकर्ता संवाद परिषद् वर्धा

हा संवाद होणे गजेचे आहे. पण आपण तयार आहोत काय ? आपल्याकडे उत्तरच नाही! कार्यकर्त्ता हा समाजाच्या गतीची नाड़ी आहेतो आहे म्हणूनच समाज समाज म्हणून जिवंत आहे पण त्याच्या जगण्याचे काय? याचा आपण कधीच गम्भिर्याने विचार करीत नाही वर्धेत हा विचार झाला। वर्धेकरंचे अभिनन्दन !

माई रमाईचा पुतला आणि मी




गेल्या अप्रैल महिन्यातल्या चार तारखेला मी महाराष्ट्राचे समाज कल्याण संचालक म़ा. इ. झेड खोब्रागडे यांच्या जन्मगावी सवारी (बिड़कर) जि. चंद्रपुर येथे माई रमाई च्या प्रतिकृतिच्या अनावरनाला आणि खोब्रागडे दाम्पत्याच्या सत्कार सोहाल्याचा निमित्ताने या सोहाल्याचा अध्यक्ष म्हणून उपस्थित होतो.याचा मला आनंद यासाठी झाला की महाराष्ट्रात मी कुठेच रमाई ची प्रतिकृति पाहिली नाही पहिल्यांदा महाराष्ट्रात माई च्या प्रतिक्रुतिचे अनावरण होते आणि मी त्या समारंभाचा अध्यक्ष असतो दुसरे असे की मुलाचे कौतुक एखाद्या गावाने करणे हे जेवढे कौतुकास्पद आहे त्याहीपेक्षा आपल्या गावाच्या सुनेचा सत्कार जेव्हा एखादे गाव करते ते गाव आदर्श आहे असे मला वाटते या अर्थाने आयुष्यमती खोब्रागडे ताईचा सत्कार करणारे सावरी (बिड़कर) हे गाव आदर्श गाव आहे. महाराष्ट्राच्या आदर्श ग्राम योजनेत हा निकष समाविष्ट करावा आणि सावरीला आदर्श ग्राम पुरस्कार द्यावा अस मी म्हणालो याप्रसंगी इ. झेड आणि खोब्रागडे ताई नि जे विचार व्यक्त केले ते प्रेरणादायक आहेत हां माझ्या आयुष्यातला अत्यंत अत्यंत अविस्मर्णीय समारोह आहे अशोक बुरबुरे यांच्या उपस्थितिने तर दुधात साखरच पडली

Monday, June 8, 2009

...हे असे होऊ नये!.. यासाठी काय करावे लागेल?...

आज महिण्यानंतर मी माझा ब्लॉग ओपन करतो आहे आणि त्याच्या तळाशी असणारया दोन कॉमेंट्स अत्यन्त आनंदाने ओपन करतो। बघतो तर काय? दिव्यता आणि आदरणीय उदयजी माझे अनुक्रमे पाहिले आणि दुसरे वाचक आहेत पहिल्यांदाच एवढे जाणकार वाचक लाभलेला मी कदाचित पहिला ब्लागर असेल? उदयजी आणि दिव्यता यांचे मनापासून आभार!... खरं म्हणजे जेव्हा हा ब्लाग ओपन केला त्यावेळीच मी यातले सातत्य कायम रहावे असा निश्चय केला होता पण तसे घडले नाही...असे होऊ नये! यासाठी काय करावे लागेल? हा माझ्या समोरचा मोठाच प्रश्न आहे! उदयजीना ते कसं जमतं ते त्यांनाच ठाउक ? अनेक बाबीं बाबत चर्चा व्हावी असं नेहमीच वाटतं , मनातल्या मनात ती होतेही पण तिचे लेखन होत नाही याचे दु:ख आज मला जास्तच जाणवत आहे। गेल्या दिवसात असेच निवडणुका, त्यात झालेला रिपब्लिकन पक्षाचा पराभव ,अकोला जिल्हयात एका बौध्द महिलेची काढलेली धिंड , मीरा कुमार यानची लोकसभेच्या सभापती पदावर झालेली नियुक्ती, डॉ नरेन्द्र जाधवांचे नियोजन आयोगावरील सादस्य पद या सगळ्या विषयांवर लिहायचे होते। लिहले नाही म्हानान्यापेक्षा ते लिहले गेले नाही असेच म्हणावे लागेल । हे सगळे विषय अत्यन्त महत्वाचे होते ...

Thursday, April 30, 2009

आंबेडकरी साहित्य मेळावा,अकोला : अ. भा. आंबेडकरी साहित्य व् संस्कृती संवर्धन महामंड्ळाचे पाहिले प्रसरण

अकोला : डाँ बाबासाहेब आंबेडकराचे नातू अड़ प्रकाश आंबेडकर याच्या अकोला पँटर्न या सूत्राने सम्पूर्ण देशात गाजलेल्या या जिल्ह्यात गेल्या पंचवीस वर्षा पासून सांस्कृतिक आन्दोलन मंदावले होते अमरावतीच्या साहित्य सम्मेलानापासून प्रेरीत होऊन संजय डोंगरे , भगवंत तायडे ,ना मु काम्बले यांच्यासारख्या काही जुन्या परन्तु नव्याने कामाला लागलेल्या कार्यकार्त्यानी हे आन्दोलन पुन्हा नव्या तेजाने आणि नव्या रुपाने सुरु केले आणि भीम जयंतीचे औचित्य साधून मुक्तीच्यामुक्तीच्या साहित्य मेलाव्याचे आयोजन केले. ध्यासानेमुक्तीच्या वाङ्मयीन दृष्टीने समीक्षा लेखन करणारे समीक्षक तथा श्रीमती के. ला. महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख दान. वसंत शेंडे याची मेलाव्याचे अध्यक्ष म्हनून यथोचित निवड केली, डॉ गंगाधर पानतावने सर उद् घाटक होते, एक देखना सोहळा या मंडळीनी साकार केला. वसंतरावांचे भाषण समकालाची वाङ्मयीन यातार्थाता आणि ध्यासानेमुक्तीच्या वाङ्मयाची काल सापेक्षता ध्यासाने करणारे आहे आंबे डकारी प साहित्य म्हणजे आबेसाहित्य इतक्या सोप्या सरल भाषेत त्यानी आंबेडकारी साहित्याची व्याख्याa केली डालीt निकालत काडाल्या शिवाय दस्यत्व निकालात निघणार नाही याचे भा न आपण आता ठेवले पाहिजे यानिमित्ताने दलित नव्हते ते दलित मुक्तीच्या ध्यासाने व्याकुल झाले होते देव धर्म आणिमोठ्या असनारया माणसाला मूल्य प्रदान करीत होते

Thursday, April 23, 2009

नव पर्वारभ....

आज हा ब्लॉग ओपन केला त्याचे सातत्य कायम रहावे एवढेच! याशिवाय आज पर्याय नाही नव्या पीढीशी बोलायचे असेल तर हाच एक मार्ग आहे, या पीढीशी तुमचा संवाद नसेल तर तुम्ही विस्मरनात जाल ! याचे भान ठेवा आणि हा नव मार्ग पत्करलेला बरा !